रसग्रहण
कवितेच्या दुनियेत प्रियकर हा प्रेयसीला नेहेमीच आश्वासने देत असतो. ही आश्वासने देताना मग चंद्र आणि तारे हे फक्त आकाशातील भौतिक वस्तू राहात नाहीत. तो तिला सांगतो - "...मी तुझ्यासाठी आकाशातले तारे पण तोडून आणेन.." वगैरे वगैरे. पण प्रेमाच्या दुनियेत अशक्य काहीच नसले तरी वास्तवात जरूरी नसते की प्रत्येक युगुलाच्या प्रेमाच्या कहाणीचा शेवट त्यांच्या मिलनात व्हावा. अश्याच एकाच्या प्रेमाची कहाणी म्हणजे ही कविता. स्वाभाविकपणे कवितेतला रस हा करूण रस आहे. फार तीव्र नाही पण मोजक्याच शब्दात व्यक्त केलेलं हे एक व्यर्थ प्रेमाचं रुदन आहे.
'गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे' - हो मी तुला दिलेल्या वचनातलं हे देणं मात्र राहून गेलं. मला अजुन आठवतयं की मी तुला म्हणालो होतो की देईन तुला ही मी नक्षत्र आणुन देईन. पण नाही जमलं मला ते. आणि मग राहूनच गेलं ते. 'माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने' - तुला द्यायला माझ्यापाशी आता फक्त काही क
Monday, March 16, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment